Dainik Maval News : महर्षी कर्वे आश्रम शाळा कामशेत येथील विद्यार्थ्यांनी फाली (फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया) उपक्रमांतर्गत माती परीक्षण केले. यावेळी माती परीक्षण आणि माती संवर्धन याबद्दल जनजागृती करण्यात आली. उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने आणले होते. माती परीक्षणातून मातीतील सामू ,नत्र ,स्फुरद, पालाश यांचे प्रमाण तपासण्यात आले.
कृषी शिक्षक प्रेरणा साळुंखे यांनी मातीतील पिकाला घटकांचे प्रमाण किती लागते, याबद्दल माहिती दिली. सोबत खताची कमी अधिक मात्रा दिल्याने काय परिणाम होतात याबद्दलही मार्गदर्शन केले. माती परीक्षण करणे का गरजेचे आहेत आणि त्याचे फायदे याबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती दिली.
जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी उपस्थित होते. त्यांनाही मातीचा नमुना कसा घ्यावा आणि परीक्षण कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी एसबीआय फाउंडेशन आणि फाली यांचे आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक