मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात घडला आहे. आज (शनिवार, 25 मार्च) रोजी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. द्रुतगती मार्गावर किलोमीटर 45/300 वर मुंबई च्या दिशेने जाण्याऱ्या लेनवर हा अपघात घडला. यात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने सदरचा ट्रक सुरक्षा भिंतीवर आदळला आणि लेनवरच पलटी झाला. ( Truck Accident Near Khandala On Mumbai Pune Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुदैवाने मुख्य लेनवर हा अपघात झाला तेव्हा वाहनांची संख्या अधिक नसल्याने मोठा अपघात झाला नाही, तसेच कोणतीही जिवितहानी देखील झाली नाही. मात्र ट्रकचा चालक या अपघातात किरकोळ जखमी झाला, ज्यास ॲम्बुलन्स मधून ताबडतोब उपचारार्थ पाठवण्यात आले. तसेच आयआरबी पेट्रोलिंग आणि महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
अधिक वाचा –
– धक्कादायक! लोणावळ्यात तीन अल्पवयीन मुलांकडून शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला
– वेहेरगाव, कार्ला, मळवली सह ‘या’ गावांत मद्य विक्रीला बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाचा सविस्तर