Dainik Maval News : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली. ही कारवाई घोरावडेश्वर डोंगराजवळ करण्यात आली.
ओमकार बाळू भारती (वय २२, रा. भवानी नगर, कासार आंबोली), प्रशांत उर्फ पैलवान शांताराम आंबेकर (वय २६, रा. देवळे, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ओंकार भारती आणि प्रशांत आंबेकर या दोघांना ताब्यात घेतले.
संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ५५ हजार रुपये किमतीचे दोन पिस्तूल आणि एक हजार रुपये किंमतीची दोन जिवंत काडतूसे मिळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ तालुक्यातील कोअर कमिट्या जाहीर ; सुकाणू समितीसह सात विभागीय कमिट्या – पाहा यादी
– तळेगाव दाभाडे कट प्रकरणात विशेष तपास पथकाची स्थापना ; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती
– “बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर” ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे