व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, February 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देहूरोड येथील गोळीबार व खून प्रकरणी दोघांना सोलापूरमधून अटक ; न्यायालयाकडून आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी

देहूरोड मधील आंबेडकर नगर येथे गुरुवारी (दि.13 फेब्रुवारी) रात्री झालेल्या गोळीबार खून प्रकरणातील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 18, 2025
in ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Two arrested from Solapur in connection with shooting and murder at Dehu raod

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देहूरोड मधील आंबेडकर नगर येथे गुरुवारी (दि.13 फेब्रुवारी) रात्री झालेल्या गोळीबार खून प्रकरणातील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसांची (दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत) पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून अद्याप एक जण फरार आहे.

शाबीर समीर शेख (वय 24), जॉन उर्फ साईतेजा शिवा चितामल्ला (वय 24,रा. विशाल मित्र मंडळाजवळ, देहूरोड, पुणे) असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहे.

  • देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड मधील आंबेडकर नगर येथे गुरुवारी (दि.13) रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रम सुरू असताना आरोपीत महिलेने चिथावणी दिल्याने तिघांनी मारहाण करीत चार गोळ्या झाडल्या. यामध्ये विक्रम रेड्डी याला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर नंदकिशोर यादव गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, अजयकुमार राठोड, पोलीस हवालदार किरण खेडकर, प्रवीण माने, बाळासाहेब विधाते, पोलीस नाईक सुरेश ढवळे, पोलीस शिपाई प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, युवराज माने, शुभम बावनकर, अमोल माने, पंकज भदाणे यांनी फरार मारेकऱ्यांपैकी शाबीर आणि साईतेजा याला सापळा रचून सोलापूर येथून रविवारी अटक केली.

आरोपीत महिलेला घटनेनंतर ताबडतोब अटक करण्यात आली होती. तिला न्यायालयाने सात दिवसांची (गुरूवार, दिनांक 20 फेब्रुवारी पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर येथून अटक केलेल्या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले, असता न्यायालयाने दोघांनाही सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे करीत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime


Previous Post

शाब्बास..! केतन घारे ‘मावळ चषक’चा मानकरी ; राहुल सातकर ‘मावळ कुमार’ तर भक्ती जांभूळकर ‘महिला मावळ चषक’ची मानकरी

Next Post

राज्यातील प्रत्येक अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती । Shiv Jayanti 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Jayanti will be celebrated in every Anganwadi in Maharashtra

राज्यातील प्रत्येक अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती । Shiv Jayanti 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP candidate Pallavitai Dabhade strong in Induri-Varale Zilla Parishad group on development works

विकासकामांच्या जोरावर इंदुरी-वराळे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पल्लवीताई दाभाडे यांचे पारडे जड

February 3, 2026
Mahagaon villagers determined to give majority of votes to candidate Dattatray Gund and Simatai Thakar

काले-कुसगांव गटाचे उमेदवार दत्तात्रय गुंड आणि काले गणाच्या उमेदवार सिमाताई ठाकर यांना मताधिक्य देण्याचा महागाव ग्रामस्थांचा निर्धार

February 3, 2026
Voters are determined to bless NCP candidate Deepali Hulawale to build Maval

स्व. अजितदादा पवार यांच्या स्वप्नातील मावळ घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवार दिपाली हुलावळे यांना मतरूपी आशीर्वाद देण्याचा मतदारांचा निर्धार

February 3, 2026
Voters in Karla Waksai Deoghar Village give positive support to NCP Candidate Deepali Hulavale

कार्ला, वाकसई, देवघर पंचक्रोशीतील मतदारांचा दिपाली हुलावळे यांना सकारात्मक पाठींबा ; मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द

February 3, 2026
Chandkhed Panchayat Samiti Ganat Late Ajitdada Pawar Raksha Kalash Darshan Yatra

चांदखेड पंचायत समिती गणात स्व. अजितदादा पवार रक्षा कलश दर्शन यात्रा ; श्रद्धांजली अर्पण करताना नागरिकांच्या भावना अनावर

February 2, 2026
Crime

लोणावळा जवळील टायगर पॉइंटच्या दरीत आढळला ‘त्या’ बेपत्ता तरूणीचा मृतदेह

February 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.