Dainik Maval News : नो एन्ट्रीतून आलेल्या कारने दुसऱ्या कारला धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्याच्या पुढे शनिवारी (दि. १४) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.
विशाल पुंडलिक बडीगिर (वय ३९, रा. मोहननगर, चिंचवड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गमनाराम रणछोडदास चौधरी (वय ३२, रा. पुनावळे) यांनी रविवारी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एमजी हेक्टर कार भरधाव वेगात विरुद्ध दिशेने चालवून फिर्यादीच्या सफारी कारला धडक दिली. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. तसेच आरोपी चालक बडीगिर याचा मृत्यू झाला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीकडून शहराचा प्रारूप विकास आराखडा (डीपी) प्रसिद्ध । Vadgaon Maval Nagar Panchayat
– प्रेमसंबंधातील वादातून प्रेयसीकडून तीस वर्षीय प्रियकराचा खून ; इंदोरी, मावळ येथील घटना । Maval Crime
– चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम