तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा ( ता. मावळ ) या ठिकाणी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दिनांक 2 मे) रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. कुंडमळा येथील बंधाऱ्यात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही मुले बुडाली. साजीद शरीफ बागवान (वय 20 रा. निगडी) आणि आतीक शरीफ बागवान (वय 15, रा. जळगाव) असू बुडून मृत पावलेल्या दोन मुलांची नावे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांना सायंकाळी मुले बुडाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याची खबर वन्यजीवर रक्षक मावळ संस्थेला दिली. घटनास्थळी वन्यजीवच्या सदस्यांनी आणि पोलिसांनी धाव घेतली. रात्री 7.30 वाजेपर्यंत दोन्ही मुलांचे शव पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य, आपदा मित्र मावळ तालुका, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या रेस्कू टीमचे निलेश गराडे, प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर यांसह तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन, इंदोरी पोलीस चौकी येथील अधिकारी कर्मचारी यांनी रेस्कू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परत येत असलेल्या बर्वे कुटुंबावर काळाचा घाला । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळ लोकसभा : संजोग वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा जाहीर !