Dainik Maval News : श्रीक्षेत्र खंदरा (राजस्थान) येथे होणाऱ्या तेविसाव्या भक्ती महोत्सवाला मावळ तालुक्यातील सुमारे दोनशे वारकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी दिली.
राजस्थान वारकरी संप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष व मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे मार्गदर्शक रमेशसिंह व्यास यांच्या पुढाकाराने राजस्थान येथील श्रीक्षेत्र खंदरा हनुमान मंदिर येथे दरवर्षी भक्ती महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा दिनांक २० ते २४ जानेवारी दरम्यान २३वा भक्ती महोत्सव साजरा होणार आहे. या भक्ती महोत्सवामध्ये भजन, कीर्तन, काकड आरती, महाआरती, शोभायात्रा, यज्ञ, अन्नदान इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
अनेक साधू-संत व देशभरातील राजकीय, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवासाठी मावळ तालुक्यातील सुमारे दोनशे भाविक-भक्त व वारकरी सहभागी होणार आहेत. या वारकऱ्यांची संपूर्ण व्यवस्था रमेशसिंह व्यास यांच्याकडून करण्यात आलेली आहे, अशी माहिती नंदकुमार भसे यांनी दिली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– निर्णयाचे ढोल वाजविले… आता पुढे काय ? पुणे – लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्र्रॅकचे काम अद्यापही फायलीत अडकले
– महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई कॅबीनेट’ , गतीमान कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय, जाणून घ्या अधिक
– पाणी पुरवठा योजनांची कामे ठरविलेल्या मुदतेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई होणार