Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे इको वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि.7) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडला.
शामराव मारुती बोंबले (वय 51, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मुलगा सचिन शामराव बोंबले (वय 28, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इको गाडी (एमएच 14 सीएस 3448) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव बोंबले हे त्यांच्या दुचाकी (एमएच 01 डीजे 8381) वरून आनसुटे मावळ येथून बधलवाडी येथील एका कंपनीत जात होते. बधलवाडी येथे चिस्को कंपनीजवळ आल्यांनतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या इको गाडीने जोरात धडक दिली.
सदर अपघातात बोंबले रस्त्यावर पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर इको वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच बोंबले यांना रुग्णालयात दाखल न करता पळून गेला. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha