Dainik Maval News : कंटेनरच्या धडकेत एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.10) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आंबेठाण-चाकण रोडवर आंबेठाण येथे घडली. पूजा विनोद ढमाले (वय ४४, रा. कडूस, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी मंगेश बाळासाहेब पानमंद (वय ३१, रा. सुदुंबरे, ता. मावळ) यांनी मंगळवारी (दि. १०) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंडलिक बाळू टोणे (वय ४४, रा. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंडलिक टोणे हा त्याच्या ताब्यातील कंटेनर (डीडी ०१/एफ९६५१) आंबेठाण-चाकण रोडने घेऊन जात होता. आंबेठाण येथे महिंद्रा सीआय कंपनी समोर आल्यानंतर टोणे याने त्याच्या ताब्यातील कंटेनरने समोर जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १४/एलएफ ११७९) क्लिनर बाजूने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार पूजा ढमाले हिचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक