कासारसाई धरणावर (ता. मावळ) फिरण्यासाठी आलेल्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवार (दि. 29 मे) रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. मुरली कृष्णा बोला (वय 21, रा. कोरेगाव पार्क, पुणे; मूळ रा. आंध्र प्रदेश) आणि कुणाल सर्वेश दुबे (वय 21, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) अशी बुडून मृत पावलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये बी. कॉमचे शिक्षण घेत असलेले 4 विद्यार्थी कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते. ते जलविहाराचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरले मात्र खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यातील दोन विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी बुडालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच शिरगाव पोलिसांना कळविले. ( Two youths died after drowning in Kasarasai dam Maval News )
बऱ्याच वेळानंतर तरुणांचा शोध घेण्यात आला. त्यात पीएमआरडीएच्या शोध मोहीम पथकाने एका तरूणाचा मृतदेह काढला तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने बाहेर काढले या शोध मोहिमेत निलेश गराडे, अनिल आंद्रे, अनिश गराडे, अविनाश कारले, निनाद काकडे, शुभम काकडे, विनय सावंत, गणेश ढोरे, कुंदन भोसले, अजय मुऱहे, भास्कर माळी यांनी शोधकार्यात सहभाग घेतला होता.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून ‘प्रवीण ढमाले’ यांची नियुक्ती । Maval Lok Sabha
– गाडी चालवता येते पण पक्के लायसन्स नाही? आरटीओकडून जून महिन्यातील वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– सर्वांनाच आतुरता निकालाची ! 2 वाजेपर्यंत समजणार मावळचा नवा खासदार, किती फेऱ्या होणार? कशी आहे व्यवस्था? वाचा सविस्तर