जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी मिळून दोन मित्रांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घोणशेत (ता. मावळ) येथे घडली आहे. राजेश वासुदेव ढगे यांनी याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश वासुदेव ढगे (वय 26 रा. घोणशेत ता.मावळ) हा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घोणशेत येथील राहूल घोजगे यांच्या फार्महाऊसवरील गुरांच्या गोठ्यात गेला असता जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी समीर चोरघे, नवनाथ चोरगे, अश्विन चोरघे (सर्वजण राहणार घोणशेत) यांनी राजेश ढगे यास दमदाटी व शिवीगाळ करून आरोपी अश्विन चोरगे यांने डोक्यात कोयत्याने वार केला. ( Two youths were attacked with knife due to an old dispute Maval Crime Kamshet Police )
यावेळी ढगे यांचा मित्र निलेश आलम (रा. घोणशेत) हा त्याला सोडविण्यासाठी गेला असता त्याला दोघांनी धरले आणि त्याच्याही डोक्यात कोयत्याने वार केला. नंतर तो मृत झाला असे गृहीत धरून मारहाण करणारे सगळे पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत गुन्ह्याची नोंद कामशेत स्टेशनमध्ये करण्यात आली असून आरोपींविरुद्ध भादवि कलम 307, 114, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई शेडगे करत आहे.
अधिक वाचा –
– पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 7 उमेदवारांची माघार । Pune News
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– धक्कादायक ! लग्न लावून घरी परतत असलेल्या दोन महिलांचे गंठण चोरट्यांनी केले लंपास, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल