Dainik Maval News : वडगाव मावळ शहरातील श्री पोटोबा महाराज मंदिराच्या मागे शनिवारी (दि. १० जानेवारी) सकाळी एक ३० ते ३५ वर्षीय वयोगटातील अनोळखी मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वडगाव मावळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोटोबा मंदिराचे पुजारी अशोक शंकर गुरव यांनी या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी मंदिराच्या पाठीमागील भागात हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
मयताच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट आणि वरून राखाडी रंगाचे जॅकेट घातलेले आहे. उजव्या हाताच्या बोटात स्टीलच्या अंगठ्या आहेत, फ्रेंच कट दाढी वाढलेली आहे आणि डाव्या हाताच्या पोटरीवर गोंदलेले आहे.
तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ननावरे करत आहेत. या वर्णनाचा कोणताही व्यक्ती बेपत्ता असल्यास किंवा या मयताबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास वडगाव मावळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक

