Dainik Maval News : लोणावळा येथील समतानगर, वलवण भागातील नवचैतन्य तरुण मंडळ आणि रमामाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्त प्रमुख उपस्थित केंद्रीय सामाजिक न्याय व आधीकरिता राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुनील शेळके हेही उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि भीमअनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समता, बंधुता आणि प्रगतीचा मार्ग या नव्याने स्थापन झालेल्या विहारातून अधिक बळकट होईल, असा विश्वास वाटतो, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
यावेळी सिमा आठवले, सूर्यकांत वाघमारे, यमुना साळवी, नारायण पाळेकर, देविदास कडू, निखिल कवीश्वर, नासिरभाई शेख, दिलीप दामोदरे, संजय भोईर, अरुण लाड, लक्ष्मण भालेराव, मालन बनसोडे, रघुनाथ गायकवाड, गणेश गायकवाड, अंकुश सोनवणे, महेश केदारी, अशोक सरोदे, सनी पाळेकर, भावना ओव्हाळ, राजु देसाई, अनिता वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे आगारात पाच नव्या एसटी बसगाड्यांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकार्पण । Talegaon Dabhade
– ‘स्थानिक’च्या इच्छुकांची धावपळ वाढली ; गाठीभेटी आणि लग्नसोहळ्यातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
– मोठी बातमी : प्रभाग रचना तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करा ; निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश