Dainik Maval News : गणेशोत्सवादरम्यान तरूणाई एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करण्यासोबत अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. यामुळे गावोगावी गणेशोत्सव निमित्त कार्यरत असणाऱ्या गणेश मंडळांच्या माध्यमातून तरूणाईची होणारी एकजूट सामाजिक विकासासाठी गरजेची असल्याचे मत एसीपी (असिस्टंट कमांडंट इन सीआरपीएफ) विकास कुंभार यांनी व्यक्त केले.
पवन मावळातील शिळींब (ता. मावळ) या आपल्या मुळ गावी गणेशोत्सवात सहभागी झाल्यानंतर एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिळींब येथील शिवराय फ्रेंड्स सर्कल ( गावठाण ) या मंडळाने यंदा भव्य गणेशोत्सव आयोजित केला आहे. मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे पंधरावे वर्ष आहे. यानिमित्त एसीपी विकास कुंभार यांनी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मोफत टीशर्ट वाटप केले.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमास एसीपी विकास कुंभार यांसह त्यांच्या पत्नी विशाखा कुंभार, पोलीस अधिकारी संतोष मोरे गावातील ज्येष्ठ नागरिक वाघू दरेकर, भोपळे तात्या, रघुनाथ बिडकर, विष्णू बिडकर, मधुकर केदारी, भगवान दरेकर, बाळू दरेकर, संतोष बिडकर, रोहित केदारी, शंकर यादव, सचिन बिडकर, देवीदास केदारी, भावेश केदारी, संकेत बिडकर, तन्मय यादव आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातील एसीपी कुंभार यांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान गावातील ज्येष्ठ नागरिक वाघू दरेकर आणि भोपळे तात्या यांच्या हस्ते करण्यात आला. तदनंतर प्रमुख अतिथी एसीपी विकास कुंभार यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार विशाल कुंभार यांनी केले. आभार सचिन बिडकर यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka