वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे निधन झाले आहे. सोपानराव म्हाळसकर उर्फ आण्णा यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज (दि. 21 एप्रिल) रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा ही सायंकाळी साडेचार वाजता निघेल आणि अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी वडगाव मावळ येथे होईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘चंदनापरी देह झिजविला, कष्टातून संसार फुलवला…’
तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त म्हणून सोपानराव म्हाळसकर हे संपूर्ण मावळ तालुक्याला परिचित होते. देवस्थानच्या उभारणीपासून ते आता अलीकडे देवस्थानला राज्य सरकारने ‘क दर्जा’ देईपर्यंत सोपानराव म्हाळसकर यांनी अविरत कष्ट घेतले. विश्वस्त समितीमार्फत त्यांनी अनेक कार्यक्रम पार पाडले.
सोपानराव म्हाळसकर हे वडगांव नगरीचे माजी सरपंच देखील राहिले होते. त्यांचा स्पष्ट वक्तेपणा सर्वांनाच आवडत असे. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी ते आदरस्थानी होते. संयमी, अभ्यासू आणि अजातशत्रू व्यक्ती असलेले सोपान आण्णा म्हाळसकर यांच्या निधनावर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. ( Vadgaon Maval Potoba Maharaj Devasthan Chief Trustee Sopanrao Mhalskar Passed Away )
अधिक वाचा –
– धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade
– एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या
– मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी ‘माधवी जोशी’ यांना उमेदवारी जाहीर । Maval Lok Sabha