Dainik Maval News : साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा.. या उक्तीप्रमाणे साडेतीन मूहर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर विजयादशमी निमित्ताने वडगाव मावळ मधील शिवभक्तांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीचा शिवकाळ जागवत सिमोल्लघन केलं.. या शिवभक्तांनी शिवकालीन पारंपरिक वेशभूषेत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला गावात फेरफटका मारत लहान मुलांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांना विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
शहरातील तरुणांमधील नकारात्मक प्रवृत्तीचे दहन करून सर्वत्र सकारात्मकतेचे चैतन्य निर्माण करण्यासाठी तसेच अज्ञानावर ज्ञानाने.. असत्यावर सत्याने.. वैऱ्यावर प्रेमाने आणि शत्रुवर पराक्रम गाजवित विजय प्राप्त करण्याचा हा दिवस असल्याने आपल्या ग्रामीण भागात प्रबोधन करण्याच्या अनुषंगाने हा अनोखा बेत तयार करण्यात आल्याचे या सदस्यांनी सांगितले.
सध्याच्या या युगामध्ये हा पोशाख खूप अनोखा जरी वाटतं असला तरी पण तो पोशाख परिधान केल्यावरती अंगात एक नवीनच ऊर्जा येते हा शिवकालीन पोशाख परिधान करून श्रीमंत सरदार महादजी शिंदे स्मारकापासून ते ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर महादेव मंदिर, मारुती मंदिर, कुलदैवत खंडोबा मंदिर, पंचमुखी मारुती मंदिर , या मंदिरांना भेट देऊन सर्वांनी नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सूर्यकांत वाघमारे यांची आरपीआय पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती । Suryakant Waghmare
– मोठी बातमी ! मावळ तालुक्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळांचा दर्जा, पाहा यादी
– शिक्षणासाठीची पायपीट थांबणार ; आमदार सुनिल शेळके फाउंडेशनकडून शिरगाव येथे विद्यार्थ्यांना मोफत सायकल