Dainik Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत सुमारे 65 लक्ष 92 हजार रुपये इतक्या निधीतून वडगाव नगरपंचायत हद्दीतील केशवनगर येथील प्रभाग क्रमांक 1 मधील गोखले लेआउट परिसरात 5 दशलक्ष लिटर पाण्याची टाकी बांकामास सुरुवात करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी दिली.
खूप वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याच्या प्रश्न आणि केशवनगर परिसरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या भागात नव्याने पाच दशलक्ष क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात येत आहे. अखेर पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याने आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होत असल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होऊन नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार