Dainik Maval News : वडगाव नगर पंचायतीत सध्या प्रशासकीय राज सुरू असून या प्रशासकीय कालावधीत सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28 फेब्रुवारी) मंजूर करण्यात आला. एकूण 98 कोटी 79 लाख 33 हजार 87 रुपयांचा व 11 लाख 67 हजार 501 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासकीय ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे.
वडगाव नगर पंचायतीच्या अर्थसंकल्पाचे विवरण पाहिले असता, नगर पंचायतीकडे प्रारंभाची शिल्लर ही 4 कोटी 89 लाख 67 हजार 101 रुपये होती, त्यात महसूली उत्पन्न, शासनाकडून मिळणारे अनुदान, इमारती व जागा भाडे, फी व आकार, विक्री व भाडे करणारे आणि इतर उत्पन्न स्त्रोतातून नगर पंचायतीला एकूण 24 कोटी 2 लाख 70 हजार 487 रुपये एकूण उत्पन्न अपेक्षित आहे. यातून महसूली खर्च, अपंग कल्यणाकारी योजना, दुर्बल घटक, महिला व बालकल्याण योजना आदींचा खर्च हा 25 कोटी 86 लाख 77 हजार 327 रुपये इतका आहे.
नगर पंचायतीची सन 2025-26 काळात भांडवली जमा (विकास कामे अनुदान) राशी ही 69 कोटी 98 लाख 63 हजार 1 रुपये अपेक्षित असून भांडवली खर्च 72 कोटी 92 लाख 55 हजार 760 रूपये इतका आहे.
एकूण नगर पंचायतीचा अर्थसंकल्प लक्षात घेता नगर परिषदेकडे प्रारंभीची शिल्लक, महसुली जमा, भांडवली जमा राशी ही 98 कोटी 91 लाख 589 रुपये अपेक्षित असून सन 2025-26 या आर्थिक वर्षांत नगर पंचायत महसुली खर्च व भांडवली खर्च वगळून 11 लाख 67 हजार 502 रुपये शिल्लक असतील. असा एकूण 98 कोटी 91 हजार 589 रुपयांचा व 11 लाख 67 हदार 502 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नगर पंचायतीने शुक्रवारी मंजूर केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा