Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीत सन 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 28 फेब्रुवारी) मंजूर करण्यात आला. एकूण 98 कोटी 79 लाख 33 हजार 87 रुपयांचा व 11 लाख 67 हजार 501 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प प्रशासकीय ठरावाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. यात नगर पंचायतीने भांडवली खर्च 72 कोटी 92 लाख 55 हजार 760 रूपये इतका दाखविला असून विविध विकास कामांवर नगर पंचायत खर्च करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
2025-26 वर्षांत नगर पंचायत पुढील विकास कामांवर खर्च करणार
1. पाणीपुरवठा योजना – 1150 लक्ष
2. पाणीपुरवठा जलवाहिनी व जलशुध्दीकरण केंद्र – 253 लक्ष
3 .रस्ते – 1870 लक्ष
4. प्रशासकीय इमारत – 125 लक्ष
5. घनकचरा व्यवस्थापन – 175 लक्ष
6. स्वच्छाता अभियान / माझी वसुंधरा अभियान खर्च – 745 लक्ष
7. तलाव,नाले व विहीर संवर्धन व सुशोभिकरण – 100 लक्ष
8. ड्रेनेज नेटवर्क (Drainage Network) – 50 लक्ष
9. विद्युत व्यवस्था – 52 लक्ष
10. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत खर्च – 200 लक्ष
11. E-charging Station उभारणे – 5 लक्ष
12. जमीन संपादन करणे – 335 लक्ष
13. सांडपाणी प्रकल्प डी पी आर – 200 लक्ष
14. विशेष सहाय्य योजनेंतर्गत मल्टीपर्पज हॉंल व शॉप बांधणे – 482 लक्ष
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा