Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक २०२५ करिता नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सन २०२५ करीता दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती.
राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार आणि प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने, तसेच निवडणुक आयोगाकडील प्राप्त संभाव्य यादीअन्वये प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. आणि ती नावे एकापेक्षा अधिक वेळा आली असल्याचे आढळुन आले आहे. तरी प्रारुप मतदार यादीतील अशा दुबार नावांची यादी वडगांव नगरपंचायत सूचनाफलकावर तसेच https://mahaulb.in या संकेतस्थळावर दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ पासुन उपलब्ध आहे.
या यादीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांना कोणत्या प्रभागात मतदान करावयाचे आहे, याबाबत लेखी अर्ज रहिवास पुराव्यासह दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वडगाव नगरपंचायत कार्यालयात सादर करावेत, अशी सूचना प्रशासक तथा मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत डॉ. प्रवीण निकम यांनी दिली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– ठरलं तर… मावळ तालुक्यात ‘हे’ 5 पक्ष ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार
– राज्यावर पुन्हा पावसाचे सावट; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती, मावळातील भातउत्पादक शेतकरी चिंतेत
– दिवाळी संपताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार ; मावळात इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर




