Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असलेल्या मृणाल म्हाळसकर आणि उर्वरित सर्वच उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी ( दि. २२ नोव्हेंबर) होणार आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.
शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वडगाव नगरीचे ग्रामदैवत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज मंदिर येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार अॅड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर आणि सतरा वॉर्डातील पक्षाचे सर्व अधिकृत उमेदवार ( यात युतीचे काही उमेदवार) यांच्याही प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मृणाल म्हाळसकर यांनी दिली आहे.
वडगाव शहरात भारतीय जनता पार्टी पक्षाची मोठी ताकद आहे. पूर्वीपासून वडगाव शहर हे संघाचे केंद्र राहिले असून भाजपाचा बालेकिल्ला राहिलेले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव शहराच्या वडगाव नगरपंचायतीवर पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने कंबर कसली असून पक्षाने सर्व जागांवर तगडे उमेदवार उभे केले आहेत.
या सोबतच नगराध्यक्षपदासाठी मृणाल म्हाळसकर यांच्यासारखी सुशिक्षित आणि नागरी समस्यांची जाण असणारी आणि समस्या सोडविण्याचे योग्य धोरण असणारी महिला उमेदवार दिली आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला असून स्वतः प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याने मोठा उत्साह आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगावमध्ये सतरापैकी नऊ वॉर्डात दुरंगी लढत ! नगराध्यक्षपदासाठी 4 महिला रिंगणात ; आठ वॉर्डात अपक्षांमुळे बहुरंगी लढत
– लोणावळ्यात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र ; शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या पक्षाला पाठिंबा, आमदार सुनील शेळके यांना मोठे यश
– तळेगावमध्ये 19 उमेदवार बिनविरोध नगरसेवक! नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदाच्या नऊ जागांसाठी 23 जण रिंगणात । Talegaon Dabhade
