वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२५ : राज्य निवडणुक आयोगाने दिनांक ४ नोव्हेंबर रोजी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक-२०२५ कार्यक्रम घोषित केला आहे. सदर कार्यक्रमानुसार वडगाव नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाकरिता सोमवारी ( दि. 17) रोजी पर्यंत एकूण ८९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवारी ( दि. 18) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात उमेदवारांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली.
प्राप्त ८९ नामनिर्देशन पत्रांपैकी ७७ पत्र वैध झाले, असून उर्वरित १२ नामनिर्देशन पत्र अवैद्य झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष (महिला) पदाकरिता करिता ७ पैकी ६ अर्ज वैध. नगरसेवक पदाकरिता महिलांचे ३४ पैकी २७ वैध व पुरुषांमध्ये ४८ पैकी ४४ वैध आहेत, असे एकूण नगरसेवक पदाकरीता ७१ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.
प्रभागनिहाय माहिती पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र.१- ४ पैकी ३ वैध
प्रभाग क्र.२- ६ पैकी ६ वैध
प्रभाग क्र.३- ७ पैकी ७ वैध
प्रभाग क्र.४- ३ पैकी ३ वैध
प्रभाग क्र.५- ६ पैकी ५ वैध
प्रभाग क्र.६- ६ पैकी ४ वैध
प्रभाग क्र.७- ६ पैकी ५ वैध
प्रभाग क्र.८- ४ पैकी ३ वैध
प्रभाग क्र.९- ८ पैकी ५ वैध
प्रभाग क्र.१०- २ पैकी २ वैध
प्रभाग क्र.११- ५ पैकी ५ वैध
प्रभाग क्र.१२- ३ पैकी ३ वैध
प्रभाग क्र.१३- ८ पैकी ८ वैध
प्रभाग क्र.१४- ३ पैकी ३ वैध
प्रभाग क्र.१५- ३ पैकी २ वैध
प्रभाग क्र.१६- ५ पैकी ५ वैध
प्रभाग क्र.१७- ३ पैकी २ वैध
संपूर्ण निवडणूक कार्यक्रमाचे पूर्ण आयोजन श्रीमती मनिषा तेलभाते, निवडणूक निर्णय अधिकारी व डॉ. प्रविण निकम,सहा. निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
