Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी ( दि. 17 ) संपल्यानंतर एकूण ८९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ७ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ८२ अर्ज दाखल झाले आहेत.
थोड्याच वेळात अर्ज छाननीची प्रक्रिया निवडणूक कक्षात सुरू होणार असून यातील काही अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छाननीची ही महत्त्वाची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मनिषा तेलभाते, तसेच सह-निर्णय अधिकारी आणि मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
छाननीदरम्यान कोणते अर्ज योग्य ठरतात आणि कोणते बाद होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छाननीनंतर २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे. त्यामुळे आजच्या छाननी प्रक्रियेकडे सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून नोव्हेंबर महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– तीर्थक्षेत्र आळंदी कार्तिकी यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनाई आदेश लागू – वाचा अधिक
– नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका : उमेदवारी अर्जाबाबत अत्यंत महत्वाची बातमी, ‘ही’ चूक बिलकूल करू नका
