व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हर घर तिरंगा… हर घर स्वच्छता… अभियान अंतर्गत वडगाव नगरपंचायतीने राबविले विविध उपक्रम । Vadgaon Maval

प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा "हर घर स्वच्छता" या अभियानांतर्गत शहरात विविध जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 15, 2025
in लोकल, शहर
Vadgaon Nagar Panchayat

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव नगरपंचायत वडगाव यांच्यावतीने माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली “हर घर तिरंगा “हर घर स्वच्छता” या अभियानांतर्गत शहरात विविध जनजागृती पर उपक्रम राबविण्यात आले आहेत, उपक्रमांचा दिनांकानुसार तपशील पुढील प्रमाणे.

1. ६ ऑगस्ट २०२५:- न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छता शपथ व तिरंगा शपथ घेतली त्यामध्ये सुमारे 1450 विद्यार्थी सहभागी होते
2. ७ ऑगस्ट २०२५:- शहरातील न्यू इंग्लिश स्कूल, रमेश कुमार सहानी स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सर्व जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी जाऊन त्यांना अभियानात सहभागी होण्याकरिता माहिती देण्यात आली व पुढील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. पर्यावरण पूरक तिरंगा राखी स्पर्धा, तिरंगा रांगोळी व चित्रकला स्पर्धा, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा दोड, पथनाट्य, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, भारतीय जवानांच्या साठी पत्र लेखन, तिरंगा सेल्फी आद.
3. ७ ऑगस्ट २०२५- न्यू इंग्लिश स्कूल रयत शिक्षण संस्था या ठिकाणी पर्यावरण पूरक राखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
4. ८ ऑगस्ट २०२५ – न्यू इंग्लिश स्कूल येथे तिरंगा चित्रकला स्पर्धेचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच नगरपंचायत कार्यालय या ठिकाणी तिरंगा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला या ठिकाणी 150 नागरिक व कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेतला

5. ११ ऑगस्ट २०२५ – शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयाने येथे विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाची वाटप करण्यात आले 500 तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले
6. १२ ऑगस्ट २०२५ – जिल्हा परिषद शाळा केशवनगर, न्यू इंग्लिश स्कूल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचा प्रवास याबाबत लघु चित्रपट दाखवून त्यावरती प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले यामध्ये सुमारे 1800 विद्यार्थी सहभागी होते. तसेच जिल्हा परिषद शाळा केशवनगर या ठिकाणी तिरंगा राखी बनवणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सुमारे 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
7. १३ ऑगस्ट २०२५ जिल्हा परिषद शाळा पंचायत समिती या शाळेचे तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या फेरीमध्ये सुमारे 250 विद्यार्थी सहभागी होते. व शहरातील नागरिकांना राष्ट्रध्वज तिरंगा चे मोफत वाटप करण्यात येत आहे व नागरिकांमध्ये तिरंगा ध्वज फडकवणे व अभियानाची जनजागृती करण्यात येत आहे
8. १४ ऑगस्ट २०२५:- वडगाव नगरपंचायत मार्फत शहरातून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली यामध्ये शहरातील 150 नागरिक व कर्मचारी उपस्थित होते सदर रॅली नगरपंचायत पासून चालू होऊन बाजारपेठ, केशवनगर, माळस्करवाडी, संभाजीनगर, डेक्कन हिल माळीनगर या ठिकाणाहून काढण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल यांच्यामार्फत शहरातून मेन बाजारपेठेत तिरंगा प्रदर्शन रॅली काढण्यात आली यामध्ये सुमारे 1000 विद्यार्थी सहभागी होते. व पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा अशा प्रकारे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 7:45 वा नगरपंचायत प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाला. स्वतंत्र सैनिक व वीरांचा सन्मान करण्यात आला. शहरात एलईडी स्क्रीन द्वारे शहरात हर घर तिरंगा हर घर स्वच्छता अभियान जागृती करण्यात आली. शहरातून भव्य तिरंगा रॅलीचे व शहरात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. वरील नमूद केलेल्या उपक्रमांमध्ये आत्तापर्यंत वडगाव शहरातील सुमारे 5500 विद्यार्थी व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; क्विंटल मागे १५० ऐवजी १७० रुपये मिळणार
– पोरांनो… तयारीला लागा ! महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
– रोजगार हमी योजना समितीचे प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात प्रकल्प पाहणी ; लाभार्थ्यांशी थेट संवाद


Previous Post

वडगाव फाटा येथील वाहतूक कोंडीवर उपाय योजण्याची गरज ! कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
MP Shrirang Barne performs water puja for Pawanamai Pawana Dam News

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पवनामाईचे जलपूजन, शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती । Pawana Dam News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
Shiva devotees send message of fort conservation by erecting Gudhi at Tikona Fort Maval

Tikona Fort Maval : किल्ले तिकोणा गडावर गुढी उभारून शिवभक्तांकडून गडसंवर्धनाचा संदेश

March 20, 2026
Illegal-Liquor

परवानगीशिवाय हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्य आढळल्यास परवाने रद्द करण्यात येणार – गृह राज्यमंत्री

March 20, 2026
E-Peek-Pahani

पीक पाहणीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधीमंडळात निवेदन

March 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.