मावळ तालुक्यातील सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली नितीन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मावळते उपसरपंच वैभव चंद्रकांत गाडे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी वैशाली शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून संगीता जाधव यांनी काम पाहिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सरपंच सुमित शिवाजी कराळे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य वैभव चंद्रकांत गाडे, गुलाब दत्तोबा कराळे, आकाश गोतारणे, सायली सुधीर कराळे, प्रीती कैलास शिंदे उपस्थित होते. निवडीनंतर सर्वांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच वैशाली शिंदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वागत शांताराम कराळे पाटील यांनी, तर सूत्रसंचालन रमेश कराळे यांनी केले. आभार राहुल कराळे यांनी मानले. ( Vaishali Shinde elected as deputy sarpanch of Sudavadi Gram Panchayat )
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे, पुना सिम्स कामगार युनियनचे प्रतिनिधी शांताराम कराळे, सँडविच मॅनेजर बाबाजी खेडेकर, सुदवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष ज्ञानोबा कराळे, माजी सरपंच गोरख गाडे, मा उपसरपंच सुरेश गाडे, विजय भांबुरे, सुदुंबरे सोसायटीचे संचालक किसन कराळे, हभप गजानन कराळे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर विश्वस्त रामभाऊ कराळे, दत्तोबा कराळे, तानाजी कराळे, विठ्ठल गाडे, बाळा आंबोले, बाळासाहेब कराळे, नितीन ताठे, रमेश कराळे, भाऊसाहेब कराळे ,मा.तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कराळे, विठ्ठल कराळे,अवतार सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पुणे हिट अँड रन केस : पुणे शहरातील ‘ते’ दोन पब बंद करण्याचे थेट जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Pune Hit and Run Case
– ‘राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले असते तर…’, निकालाआधीच श्रीरंग बारणेंनी राष्ट्रवादीकडे दाखवले बोट । Maval Lok Sabha
– बारावी बोर्ड परीक्षेत करिना देवकर प्रथम, कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा यंदा 94 टक्के निकाल