Dainik Maval News : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम विरोधात सुरू केलेल्या जन आंदोलन व स्वाक्षरी मोहिमेला लोणावळा शहरातही मोठा प्रतिसाद मिळाला. वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहराच्या वतीने आयोजित या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या मोहिमेचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले.
सदर आंदोलनात लोणावळा शहरातील अनेक पक्ष, संघटना आणि नागरिकांनी आपली स्वाक्षरी करून ईव्हीएम विरोधात आपला ठाम विरोध दर्शविला आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
लोकेश भडकवाड (अध्यक्ष), संजय कांबळे, विशाल कांबळे, सोनू कदम, विशाल गायकवाड, रोहन कांबळे, मुरली सरोदे, रोशन रणपिसे, रोहन गायकवाड , प्रवीण रोकडे ,अब्दुल भाई शेख, चितानंद चिंचोरे, भगवान अवचर, अनिल जाधव, राजेंद्र अडसुळे, अभिजित धांढोरे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच जयश्री सदावर्ते (महिला उपाध्यक्ष, पुणे जिल्हा), संगीता अवचर, रत्नप्रभा देशपांडे, आशा वाघमारे, मंगल आखाडे, अमृता रोकडे, विद्या साळवे, नीता गायकवाड, नलिनीताई दादू इंदुरीकर, शानाबाई तळेकर, शामाबाई तळेकर प्रिया लांडगे, सुवर्णा डोंगरे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद टाकवे बुद्रुक शाळेचे वर्चस्व । Maval News
– मळवंडी ठुले येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न, पाहा संपूर्ण निकाल
– वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी