केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले आहे. ही यात्रा गावपातळीवर सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका, महानगरपालिकेच्या क्षेत्रात राबवली जाणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ विधानसभा मतदारसंघातील शिवणे गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी सुधीर भागवत, मावळ विधानसभा भाजपाचे प्रचार प्रमुख रविंद्र भेगडे, शिवणेचे सरपंच महेंद्र वाळुंज, उपसरपंच कविता शेटे यासह भाजपा नेते विठ्ठल घारे, अविनाश गराडे, एकनाथ पोटफोडे, धनंजय टिळे तसेच शिवणे गावचे ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी ताई, बचत गटातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( viksit bharat sankalp yatra in shivne village of maval taluka )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील 9 वर्षात विविध कल्याणकारी योजना राबवल्या असून देशातील लाखो नागरिकांना त्याचे लाभ मिळाले आहेत. अशा योजनांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होऊन ज्या नागरिकांना त्याचा लाभ घेता आला नाही, अशा नागरिकांना विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून लाभ देण्यासाठी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. मावळ तालुक्यात जवळपास 89 गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे.
अधिक वाचा –
– Breaking! द्रुतगती मार्गावर अपघात, दुधाच्या टँकरवरील चालकाचा जागीच मृत्यू
– हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेली पवनानगरी; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळ्याचे आयोजन
– तळेगाव दाभाडेतील जय वकील स्कूल इथे दिव्यांग दिन साजरा । Talegaon Dabhade