पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या कार्ला एकविरादेवी मंदिर, लोहगड – विसापूर किल्ले, भाजे – कार्ला लेणी या ठिकाणचा कार्ला – मळवली रस्त्यावरील इंद्रायणी नदीवरील पुल अद्याप अपूर्ण आहे. पावसाळा सुरू झाला तरीही पुलाचे काम सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला लोकभावनेची कदर नसून पुलाचे काम संथपणे सुरु आहे. पूल वेळेत होत नसल्याने अखेर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ कार्ला येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुलावळे आणि पाटण येथील संदिप तिकोणे या दोघांनी शुक्रवारी (दि. 14) जलसमाधी आंदोलन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन-तीन दिवसापूर्वी कार्ला परिसरात पावसाचा जोर वाढल्याने नव्या पुलाच्या शेजारी बनवलेला तात्पुरता पर्यायी साकव पुल निकृष्ट दर्जाचा असल्याने पुलावरुन पाणी गेल्याने मळवली परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला होता. जून महिना संपत आला असून पावसने अजूनही रौद्ररुप धारण केलेले नाही. जर मुसळधार पाऊस सुरु झाला तर तो पुल वाहून जाऊ शकतो. या परिसरातील नागरिकांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. ( villagers Water agitation due to non-completion of bridge over Indrayani river on Karla Malwali road )
त्यासाठीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परतेने राहिलेले काम पूर्ण करुन तात्पूरत्या स्वरुपात पुल सुरु करावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. या ठिकाणी सुरु असलेले काम संथ असल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
त्यावर सार्वजनिक बांधकांम विभागाकडून उपविभागीय अभियंता ध. ह. दराडे यांनी पुलाचे काम 5 जुलै पर्यंत पूर्ण केले जाईल असे लेखी पत्र दिल्यानंतर व साकव मार्गाची देखील दुरुस्ती करण्यात येईल हे अभियंता ज्ञानेश्वर राठोड यांनी सांगितल्या नंतर हे जलसमाधी आंदोलन सपंवण्यात आले. यावेळी सार्वजनिक विभागाचे ज्ञानेश्वर राठोड,लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ,तलाठी दिपक धनवडे, सहायक निरिक्षक किशोर शिवते,पोलिस पाटील संजय जाधव,माजी सरपंच उस्मान इनामदार,विशाल हुलावळे,अनिल हुलावळे,सोमनाथ सावंत,विनोद हुलावळे उपस्थीत होते.
अधिक वाचा –
– सर्वोच्च न्यायालयात दिनांक 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान विशेष लोकअदालत सप्ताहाचे आयोजन । Pune News
– महत्वाचे ! प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्याचे पारंपरिक बलुतेदार कारागिरांना आवाहन, जाणून घ्या योजनेची माहिती
– खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ । Pune News