Dainik Maval News : आंबवणे येथील जेष्ठ समाजसेवक हभप नंदकुमार वाळंज यांना महासन्मान सोहळ्यात विश्व जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वाळंज यांनी सामाजिक, शैक्षणिक, आध्यत्मिक, वारकरी संप्रदाय क्षेत्रासाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिल्याचे आयोजकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलन व दर्शन आशीर्वचन महासन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यात सनातन समिती व शंकराचार्य स्वामी नारायनानंदतीर्थ, कुंभमेळा समिती प.पु. महंत रामनारायणदासजी नाशिक, काशी विद्वत परिषद आचार्य प.पू. रामनारायणजी द्विवेदी, धर्मगुरु स्वामी ओमानंदतीर्थ या सर्व धर्मगुरू, आचार्य, संत मंडळींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर सोहळ्यात एकूण १११ साधू,महंत, धर्मगुरू उपस्थित होते. पुरस्कार प्राप्तीबद्दल आंबवणे, मुळशी, मावळ व लोणावळा परिसरातून वाळंज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भव्य सोहळ्यात हिंदू धर्मगुरूंचे दर्शन घडले व आशीर्वाद प्राप्त झाला. त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो. या संत महंतांच्या हस्ते झालेला गुणगौरव सोहळा मी कधीही विसरू शकत नाही, असे मत नंदकुमार वाळंज यांनी व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक