वडगाव शहरात नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या वॉटर एटीएमचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. वडगाव मावळ शहरात ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर सुरु केलेले हे पहिलेच वॉटर एटीएम आल्याची माहिती माजी नगरसेविका पुजा वहिले यांनी दैनिक मावळला दिली. ( Water ATM started in Vadgaon Maval City Inauguration by MLA Sunil Shelke )
वडगाव नगरपंचायतच्या माजी नगरसेविका पुजा वहिले आणि माजी उपसरपंच विशाल वहिले यांच्या विचारांतून तसेच समाजहिताच्या “ना नफा ना तोटा” या तत्वावर सदर वॉटर एटीएम द्वारे नागरिकांना अवघ्या 1 रुपयात एक लिटर, 5 रुपयात दहा लिटर आणि 10 रुपयात वीस लीटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे या वॉटर एटीम मशीनमध्ये कॉइन बरोबर फोन पे, गुगल पे, पेटीएम या युपीआय पेमेंटचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘या अत्याधुनिक शुद्ध वॉटर एटीएम चा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा’ असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी नागरिकांना केले.
सदर उद्घाटन समारंभा निमित्त वडगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी नगरसेवक राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक चंद्रजीत वाघमारे, माजी नगरसेवक मंगेश खैरे, शहर अध्यक्ष प्रवीण ढोरे, आफताब सय्यद, शरद ढोरे, आनंद बाफना, महावीरकाका दुबे, प्रकाश साळुंखे, सुनील दंडेल, सचिन ढोरे, प्रवीण राऊत, सागर खांदवे, शैलेश वहिले, गणेश पाटोळे, पंकज भामरे, सौरभ सावले, संतोष देशमुख, अभिजीत ढोरे, अजय भालेराव, रोहन पाटोळे आदी उपस्थित होते, उपस्थित सर्वांचे स्वागत विशाल वहिले यांनी केले, तर आभार तुषार वहिले यांनी मानले. ( Water ATM started in Vadgaon Maval City Inauguration by MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! मुंबईच्या दिशेने निघालेला कंटेनर पुण्याच्या लेनवर पलटी, 5 कारचे नुकसान, 2 जागीच ठार
– उपवास म्हणजे काय? तो का आणि कसा करावा? अधिक मास अन् श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वाचावा असा लेख
– “मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध” : आमदार सुनिल शेळके यांचा पवन मावळवासीयांना शब्द