Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांची गुरुवारी (दि.6 मार्च) पाण्यावाचून गैरसोय होण्याची शक्यता आहे. नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.6) रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अर्थात एमएसईबी तर्फे देखभाल दुरुस्तीची कामे करण्याकरिता संपूर्ण दिवस शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
त्यामुळे गुरुवारी रोजी संपूर्ण तळेगाव शहरात (गाव भाग व स्टेशन भाग) सकाळी 9 ते रात्री 9 वाजेदरम्यान पाणीपुरवठा होणार नाही. नागरिकांनी पाणीपुरवठ्यातील बदलाची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक