Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसरातील काही भागात गुरुवारी (दि. 12 डिसेंबर) आणि शुक्रवारी (दि. 13 डिसेंबर) रोजी पाणी येणार नसल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
तळेगाव शहरातील स्टेशन विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या यशवंत नगर जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे गुरुवारी व शुक्रवारी करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्टेशन विभागातील यशवंत नगर, तपोधाम कॉलनी, चाकण रोड वरील जनरल हॉस्पिटल ते मधुबन साई सिटी पर्यंतचा परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, अशी सूचना पाणी पुरवठा विभाग प्रमुख अभिजीत शिंदे यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News