Dainik Maval News : दुषित पाण्यामुळे फैलावणाऱ्या गुईलेन बैरे सिंड्रोमच्या (जीबीएस) अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील (पीएचसी) अधिकाऱ्यांनी देहू नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता पाळण्याच्या सूचना दिल्या. तसेच पाणी तपासण्याचे प्रशिक्षण दिले.
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये जीबीएस रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. हा आजार दूषित पाण्यातून अधिक फैलावत असल्याने शासनाच्या आदेशान्वये पीएचसीचे आरोग्य सहाय्यक योगेश बराटे, आरोग्य सेवक बाळू निगळे, मयूर दाभाडे यांनी नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची नगरपंचायत कार्यालयात बैठक घेतली.
- यावेळी, पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्तोत्रातील पाण्याची तपासणी करणे, शुद्धीकरण केंद्रावर योग्य प्रमाणात टीसीएल, क्लोरीन अथवा ॲलमचा वापर करून नागरिकांना पाणीपुरवठा करणे, प्रतिदिन पाण्याच्या नमुन्याची तपासणीची माहिती पीएचसीला देणे, गळती असणाऱ्या भूमिगत जलवाहिनीची तपासणी करणे अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच, खासगी आरो फिल्टर असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या पाण्याच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत तपासणी करण्याच्या सूचना देणे, अयोग्य असणाऱ्या पाण्याची माहिती संकलन करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे आदी सूचना दिल्या. यावेळी पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार करून प्रतिदिन माहिती पाठवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर