मावळ तालुक्यातील आंदर मावळ विभागातील भोयरे गावात आठवडे बाजाराचे उद्घाटन शनिवारी (दि. 10) करण्यात आले. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आणि सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांच्या संकल्पनेतून हा आठवडी बाजार सुरु करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात असा उपक्रम राबवण्यात येत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
आठवडे बाजाराचे उद्घाटन करताना मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, सरचिटणीस रोहिदास असवले, ज्येष्ठ नेते यदुनाथ चोरघे यांसह पंचक्रोशीतील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. (weekly market on every saturday started in bhoyre village of maval taluka)
- भोयरे गावातील आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना भाजीपाला आणि इतर वस्तूंसाठी पंधरा ते वीस किलोमीटर पायपीट करावी लागत होती. त्यामुळे वर्षा भोईरकर यांनी एक वर्षांपूर्वी सरपंच पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर नागरिक आणि स्थानिक भाजीपाला उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी गावातच आठवडे बाजार भरावावा, यासाठी ग्रामसभेत ठराव मंजूर करून घेतला होता. त्यानंतर आता प्रत्यक्षात आठवडे बाजार सुरु करण्यापूर्वी परिसरातील आंबळे ते सावळा आदी गावांमध्ये लाऊड स्पिकरच्या माध्यमातून ‘दर शनिवारी आठवडे बाजार भोयरे या ठिकाणी भरणार’ असल्याबाबत दवंडी दिली.
त्यामुळे गाव आणि परिसरातील भाजीपाला उत्पादक, किराणा विक्रेते, खाद्य पदार्थ विक्रेते आदी विक्रेत्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली. पहिल्यांदाच गावात भरवलेला आठवडे बाजार त्यामुळे यशस्वी झाला. आता गावातच आठवडे बाजार सुरू झाल्याने नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचणार आहे. त्यामुळे बाजारातील विक्रेते, स्थानिक नागरिक यांनी उपक्रमाचे स्वागत आणि कौतूक केले. (weekly market on every saturday started in bhoyre village of maval taluka)
अधिक वाचा –
– वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण
– धक्कादायक! मृत झालेल्या बिबट्याच्या पायाचा पंजा आणि नखे कापून नेली, अवयव चोरीप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल । Pune News
– गाव चलो अभियान अंतर्गत तुंगार्ली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा दौरा, ‘विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा’ – विक्रांत पाटील