Dainik Maval News : मुंबई-पुणे प्रवासाला नवी दिशा देणारा बहुप्रतीक्षित लोणावळा-खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची (पर्यायी रस्ता) विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने नुकताच पाहणी दौरा केला. प्रकल्प पूर्णात्वाच्या मार्गावर असला तरी डिसेंबर लोकार्पण करण्याची मुदत हुकणार आहे, असा दावा समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी केला.
यासदंर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, समितीने प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. प्रकल्प सल्लागार आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकार्यांशी आम्ही सविस्तर चर्चा केली. 2019 मध्ये कामास प्रारंभ झालेल्या 6,695कोटींच्या या प्रकल्पाच्या 4 डेडलाईन हुकल्या आहेत. प्रकल्प 96 टक्के पूर्ण झाला असला तरी सुरक्षा प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी, नियंत्रण सेंटर या बाबींना वेळ लागणार आहे.
या प्रकल्पात खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत दोन्ही दिशेने 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे आहेत. पहिला बोगदा 9 किमी, तर दुसरा बोगदा 2 किमीचा आहे. या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा ‘केबल-स्टेड पूल’ जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर आहे.
‘डिसेंबरच्या डेडलाईन पाळण्यासाठी घाई करु नका, प्रकल्प सुरक्षित होण्याकडे लक्ष द्या, असे सल्लागार कंपनीला समिती सदस्यांनी सूचना केली’, अशी माहिती आमदार रईस शेख यांनी दिली.
मिसिंग लिंक’ 13.3 किमी लांब, आठ पदरी नियंत्रित प्रवेश मार्ग आहे. हा मार्ग 20 किमी लांब धोकादायक आणि वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या लोणावळा-खंडाळा घाट विभागाची जागा घेईल. यामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरचे अंतर 6 किमी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी वाचेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे -मुंबई प्रवासाला व नागरी आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा दावा आमदार रईस शेख यांनी केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चांगला पाऊस आणि पोषक वातावरणामुळे मावळातील भात पिके तरारली, शेतकरी आनंदीत । Maval News
– मोठा निर्णय ! एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ
– आता शेतात पोहचणे झाले सोपे, मावळातील ३० वादग्रस्त रस्ते खुले करण्यात प्रशासनाला यश । Maval Taluka