Dainik Maval News : विधानपरिषदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात आले असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मालमत्ता कराची शंभर टक्के वसुली करण्याचे तळेगाव नगरपरिषदेचे लक्ष्य । Talegaon Nagar Parishad
– लगीनसराई आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे फुलांना मागणी वाढली ; फूल विक्रेत्यांना सुगीचे दिवस
– युवा कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत पक्षप्रवेश ; खासदार श्रीरंग बारणे यांनी केले स्वागत । Maval Lok Sabha