Dainik Maval News : शरीराच्या तंदुरुस्तीसाठी हिवाळा उत्तम ऋतू मानला जातो. आपले शरीर तंदुरुस्त आणि पीळदार असले पाहिजे, असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे हिवाळा सुरू होताच तरुणांची पावले जिमकडे वळतात. परंतु अभिनेत्यासारखी शरीरयष्टी करण्याचा प्रयत्न तरुणांच्या जीवावर बेतल्याच्या घटना आता वाढू लागल्या आहेत.
गेल्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील माण येथे 30 वर्षीय पैलवानाचा व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. तंत्रशुद्ध व्यायामाचा अभाव व अतिव्यायामाने जीम करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे व्यायाम करताना तज्ज्ञांना सल्ला घेणे गरजेचे आहे.
शरीराला आवश्यक असलेला व्यायाम करताना ट्रेनरचा सल्ला महत्त्वाचा आहे. मजबूत शरीर करण्यासाठी नियमित व तंत्रशुद्ध व्यायामाची गरज असते. मात्र, व्यायाम करताना दुसऱ्याची नक्कल केली जाते. त्यातून व्याधी होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह व रक्तदाबाचा आजार असलेल्या नागरिकांनी डॉक्टारांच्या सल्लाशिवाय व्यायाम करू नये. अतिव्यायामाने रक्तातील साखर कमी होण्याचा धोका असतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.
व्यायामासोबत सकस आहार, पुरेशी झोप गरजेची आहे. अतिव्यायाम केल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्यायाम करताना नियोजन करणे आवश्यक आहे. व्यायामासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. तसेच बाजारात शरीर पीळदार करणारी अनेक औषधे व गोळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ही औषधे वैद्यकीय चाचणीशिवाय घेणे अपायकारक ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांकडून दिला जातो.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपी तरुणाला 20 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ; वडगाव कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– मोठी बातमी : इंद्रायणी नदीत बुडून मुलाचा मृत्यू… ‘तो’ बुडाला हे मित्रांनी कुणालाच सांगितले नाही, पोलिसांनी ‘असा’ घेतला शोध
– भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, मावळातील बधलवाडी येथील घटना । Maval Accident News