आठ दिवसांपूर्वी काही महिला भगिनींनी भारतीय जनता पार्टी ( Bharatiya Janata Party ) मावळ तालुक्याचे ( Maval Taluka ) अध्यक्ष रविंद्र भेगडे ( Ravindra Bhegde ) यांची भेट घेऊन रेशन कार्ड काढण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगून रेशनकार्ड ( Ration Cards ) काढून देण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली होती. त्यासंदर्भात रविंद्र भेगडे यांनी मागणीची तत्काळ दखल घेत पुरवठा निरिक्षकाना योग्य त्या सूचना देत सदर महिला भगिनींना रेशनकार्ड काढून द्यावे, कुठलीही अडचण करु नये, अशा सुचना दिल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश मिळाले आहे. ( Women Of Aundhe Village Got Ration Cards )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अवघ्या आठ दिवसात काम तडीस नेते रेशन कार्ड मिळाल्याने महिला भगिनींनी रविंद्र भेगडे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भेटून आभार मानले. याप्रसंगी कोषाध्यक्ष सुधाकर ढोरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, वडगाव नगरपंचायतचे नगरसेवक दिलीप म्हाळसकर, मा सरपंच नितीन कुडे, युवा नेते महेंद्र म्हाळसकर, वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, आंदर मावळ विद्यार्थी आघाडी अध्यक्ष विठ्ठल तूर्डे आदी उपस्थित होते. ( With Help Of Maval BJP President Ravindra Bhegde Women Of Aundhe Village Got Ration Cards )
अधिक वाचा –
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाचा वडगावमध्ये प्रारंभ, रुग्णांना फळे वाटून अभियानाचा शुभारंभ
रविंद्र भेगडेंनी घेतले लोणावळ्यातील मावळचा राजा गणेशाचे दर्शन