Dainik Maval News : भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी डंपरचालकाला अटक केली. मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे गावाच्या हद्दीत बधलवाडीकडून वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर खंडोबा माळ येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.
लक्ष्मी बबन गावडे (वय ३७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती बबन बाळू गावडे (वय ३४, रा. बधलवाडी, ता. मावळ) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २८) तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजूसिंग काशिरामजी रुडे (वय ४३, रा. साईखेड, ता. दरवा, जि. यवतमाळ) असे अटक केलेल्या डंपर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन गावडे आणि त्याची पत्नी लक्ष्मी हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी राजूसिंग याने त्याच्या ताब्यातील डंपर भरधाव चालवून गावडे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये जखमी होऊन लक्ष्मी यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. ( woman on a two-wheeler died in a collision with a dumper an incident in Maval )
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा