Dainik Maval News : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मेधावीण फाउंडेशन यांच्या वतीने तळेगाव दाभाडे एसटी डेपो मध्ये कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शनिवारी (दि. 8 मार्च) रोजी जागतिक महिला दिन होता. यामुळे महिला दिनाचे औचित्य साधत फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी तळेगाव एसटी आगारात जाऊन तिथे कार्यरत असणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान सत्कार केला. यावेळी फाऊंडेशनच्या स्वाती पवार, मीरा म्हस्के, जयश्री पाटील, सुनीता अगरवाल, मीनल गोळे, अमृता भेगडे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.
- वैशाली दाभाडे यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण याबद्दल मार्गदर्शन केले. मेधावीण फाऊंडेशन करीत असलेल्या शैक्षणिक, आरोग्य व महिला सक्षमीकरण या कार्यक्रमांतर्गत कार्याची माहिती दिली.
यावेळी तळेगाव आगार प्रमुख प्रमोद धायतोंडे, उपप्रमुख मीना पोटे, लेखापाल नेहा टाक, वरिष्ठ लिपिक रोमा काकडे, लिपिक प्रज्ञा पंदारे, अमृतकर, कोळी, गरुड, भालेराव, कुलकर्णी, लाटे कमलाकर आदी महिला कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक प्रमोद नखाते यांनी केले, तर आभार स्वाती पवार यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News