“पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.पश्चिम भागातील रिंग रोड प्रक्रिया फेब्रुवारी 2023 मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच सुरू केला जाईल. यासाठी मोबदला दुप्पट केला आहे. या रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ( Work of Ring Road In Pune District Will Be Completed On Time Testimony Minister Shambhuraj Desai )
#पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल-राज्य उत्पादन शुल्क मंत्री @DesaiShambhuraj यांचे विधानसभेत निवेदन.#हिवाळीअधिवेशन2022#Pune#Ringroad
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 21, 2022
नागपूर अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडबाबत सदस्य ॲड. राहुल कुल यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत सीआरपीएफ गेटजवळ अनोळखी व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू
– मोरवे गावातील महिलांकरिता मसाला बनवण्याचे कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम