Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सडवली गावचा युवा मल्ल केतन नथु घारे याने नुकत्याच अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील ७९ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. यासह त्याने या स्पर्धेत सलग तीन पदके पटकाविण्याची किमया केली. यात दोन रौप्य व एका कांस्यपदकाचा समावेश असुन, युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तर तीन वेळा अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सहभागी झाला होता.
केतन घारे याने अहिल्यानगर येथील ६७ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातील ७९ किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. केतन याने आपल्या वजनी गटात प्रतिस्पर्धकांवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सोलापूरच्या शुभम मगर याने अटीतटीच्या लढतीत केतनचा ८-६ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले तर केतनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. केतन याने आतापर्यंत चार राज्य कुस्ती स्पर्धेत चार पदकांची कमाई केली. यामध्ये दोन रौप्य व दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.
कोथरूड, पुणे येथे २०२३ साली झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६५ किलो गादी विभागात रौप्य पदक, धाराशिव येथे गतवर्षी झालेल्या स्पर्धेत ६५ किलो गादी विभागात कांस्यपदक पटकावले असून, २०१९ साली आळंदी येथे झाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. तसेच अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी दोनवेळा ६१ किलो तर एकदा ६५ किलो वजनी गटात पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर