Dainik Maval News : महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी राज्यपातळीवर ‘यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्याविषयी ठरविण्यात आले आहे. आपल्या वाणी आणि लेखणीने समाजप्रबोधन करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
अकरा हजार रुपये, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असेल. यावर्षीचा पहिला पुरस्कार 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर आणि सचिव रामभाऊ सासवडे यांनी हा पुरस्कार जाहीर केला. सबनीस यांच्या निवासस्थानी त्यांच्या निवडीचे पत्र परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, सचिव रामभाऊ सासवडे आणि सदस्य माणिक सस्ते यांनी दिले.
मागील तीन वर्षांपासून इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि. 5 जानेवारी 2025) रोजी मोशी (ता.हवेली) येथे संपन्न होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर साहित्यिक, विचारवंत उपस्थित राहणार आहेत. या साहित्य संमेलनामध्ये उद्घाटन समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार