काले – पवनानगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता श्रीकांत मोहोळ यांची निवड झाली आहे. उपसरपंच रमेश कालेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सरपंच खंडुजी कालेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
या वेळी विहित वेळेत उपसरपंच पदासाठी योगिता मोहोळ यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक अधिकारी रवींद्र वाडेकर यांनी योगिता मोहोळ यांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. ग्रामपंचायत सरपंच खंडूजी कालेकर तसेच सदस्य रमेश कालेकर, प्रवीण घरदाळे, अमित कुंभार, उत्तम चव्हाण, छाया कालेकर, योगिता मोहोळ, रंजना कालेकर, फुलाबाई कालेकर, आशा कालेकर आदी यावेळी उपस्थित होते. ( Yogita Mohol Elected unopposed Deputy Sarpanch Of Kale Pavananagr Gram Panchayat )
योगिता मोहोळ यांच्या बिनविरोध उपसरपंच पदी निवडीनंतर सदस्यांसह ग्रामस्थांनी जल्लोष केला. निवडीनंतर गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवडीनंतर बोलताना मोहोळ म्हणाल्या की, सर्वांनी बरोबर घेऊन उर्वरित काळात प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल.
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परत येत असलेल्या बर्वे कुटुंबावर काळाचा घाला । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळ लोकसभा : संजोग वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा जाहीर !
– वराळे येथील डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये टेकट्रॉनिकस प्रोजेक्ट स्पर्धा; प्रदर्शनात दिसून आली विद्यार्थ्यांमधील प्रतिभा