Dainik Maval News : शिरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता विनायक वाघमारे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे मावळते उपसरपंच अक्षय गोपाळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर योगिता वाघमारे यांची निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच पल्लवी प्रवीण गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड सभा संपन्न झाली.
यावेळी स्वप्निल आरगडे, रोहिणी गोपाळे, अक्षय गोपाळे, समीर आरगडे, श्रीधर गोपाळे, वैशाली गोपाळे, पूजा गोपाळे, संध्या गायकवाड हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक नामदेव चव्हाण यांनी सभेचे नियोजन केले होते.
योगिता वाघमारे यांची उपसरपंचपदी निवड जाहीर होताच ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात आले. जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष रोहिदास मदने, मावळ मुळशीचे अध्यक्ष रामदास मदने तसेच लक्ष्मण मदने, शेखर गोरगले, बाळासाहेब जाधव, गणेश माकर, बाळू चव्हाण यावेळी उपस्थित होते.
माजी सरपंच राजाराम गोपाळे, ॲड जगन्नाथ गोपाळे, भानुदास गोपाळे, संभाजी आरगडे, रमेश गोपाळे, विठ्ठल गोपाळे, विजय गोपाळे, सोमनाथ गोपाळे, सचिन गायकवाड, मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नथुराम वाघमारे, भानुदास वाघमारे, केदार वाघमारे, नवनाथ गोपाळे, सुरेश गोपाळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करून सत्कार केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु