Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण संस्थेची लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह ११ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश सुरंगे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. रितेश रामा सुरंगे (वय ३२, रा. किनळे, हवेली) यांनी शनिवारी (दि. २८ मार्च) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’ येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन पुंडलिक हिंदराव वारके (वय ४४) यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ दिनेश सुरंगे लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना लिफ्टचा रोप (दोरी) तुटल्याने लिफ्ट थेट खाली कोसळली.
या भीषण अपघातात दिनेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला सोसायटीच्या कमिटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक खामगळ पुढील तपास करत आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण

