Dainik Maval News : वाहनाच्या धडकेत तरुण जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.६) दुपारी चाकण-तळेगाव रस्त्यावर घडला. शिवम (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवम याच्या आईने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम हा चाकण-तळेगाव रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातात शिवम याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर तोंडाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक पळून गेला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; आमदार शेळकेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
– गांजा बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक, गहुंजे हद्दीत पोलिसांची कारवाई, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त । Maval Crime