Dainik Maval News : गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने महाळुंगे येथून अटक केली. त्याच्याकडून ४०६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २५) सायंकाळी करण्यात आली. ऋतिक संतोष गायकवाड (वय २४, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक तरुण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ऋतिक गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता त्यामध्ये ४०६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा गांजा त्याने थेरगाव येथील ताज शहा याच्याकडून आणला असल्याचे पोलिसांना सांगितले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल ; दुपारी बारानंतर प्रवास करावा…
– मावळात होणार हरिनामाचा गजर ! कामशेत येथे एक जानेवारीपासून भव्य ‘कीर्तन महोत्सव’ – पाहा वेळापत्रक
– महाराष्ट्रात शुक्रवार – शनिवार दोन दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज ; सोमवारपासून थंडी वाढणार