Dainik Maval News : गांजा बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. तसेच तरुणाकडून तीन हजार 275 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 9) सायंकाळी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गहुंजे येथे करण्यात आली.
अमित रामसकल यादव (वय 28, रा. नाशिक) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुकाराम साबळे यांनी सोमवारी (दि. ९) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित यादव मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने स्कॉर्पिओ कारमधून जात होता. त्याने गियरच्या मागील हॅण्ड रेस्ट मध्ये एका कॅरीबॅग मध्ये गांजा ठेवला. गहुंजे येथे शिरगाव पोलिसांनी कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये 8.180 ग्रॅम गांजा, एक वजनकाटा आढळून आला.
पोलिसांनी कार, गांजा आणि वजनकाटा असा एकूण 20 लाख पाच हजार 274 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक