Dainik Maval News : देहूगाव येथे एका तीस वर्षीय युवकाने इंद्रायणी नदीच्या पुलावरून नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. बुधवारी (दि. 25) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अंकुश गजानन काळोखे (वय 30, रा. देहूगाव, विठ्ठलवाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देहूगाव गाथा मंदिर परिसरात इंद्रायणी नदी पात्रामध्ये नदीच्या पुलावरून दुपारी साडे बाराच्या सुमारास काळोखे यांनी उडी घेतली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ च्या जवानांनी नदीपात्रात शोध घेऊन दुपारी अडीचच्या सुमारास तरूणाचा मृतदेह बाहेर काढला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. सदर युवकाच्या आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार